STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Fantasy

3  

Neha Ranalkar(Nawate)

Fantasy

गुरूपौर्णिमा

गुरूपौर्णिमा

1 min
715

गरूपौर्णिमा


गुरू ब्रम्हा ,विष्णू व महेश

साक्षी परब्रह्म गुरु असे

अंधारात दीपस्तंभ गुरु

जीवनारंभी ते मातापिता

ज्यांमूळे झाले जगणे सुरू


विद्या दाते शिक्षकही गुरु

अध्यात्मिक गुरु प्रपंचात

परमार्थ शिकवती साचा

गुरूपौर्णिमेस मिळे संधी

गाऊ गान कृतकृत्य वाचा


गुरु शिष्य परंपरा छान

वाढवी ती सम्मान संस्कृती

सर्वात महान हा निसर्ग

जगण्याची शिकवतो कला

पृथ्वीलाच खरा करू स्वर्ग


आज गुरूपौर्णिमा सहज माझ्या भावनांना दशाक्षरी काव्यातून वाट मोकळी करून दिली!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy