गुरु
गुरु
गुरुविना नाही कोणा कोठे थारा
गुरु आहे जीवनाचा अंतिम किनारा
गुरु अथांग सागर आहे ज्ञानाचा
नाही तरणोपाय गुरुविना सकल जनांचा
माता असे गुरु प्रथम या जगती
देतसे संस्कारांचे अनमोल ज्ञान ती
द्वितीय गुरु पिता आदर्शवत मुर्ती
ज्याच्या अमूल्य शिकवणीने गाजे आपली किर्ती
पहिले पाऊल पडता विद्यालयी
स्थान गुरुचे शोभे शिक्षकाप्रती
देती ज्ञान विविध विषयांचे सखोल
विज्ञान अन् तंत्राचे वाट जे पुढची दाखवती
स्थान गुरुचे महत्त्वाचे आपल्या जीवनी
गुरुबद्दल सदभाव राहू द्यावा मनी
विविध ज्ञान देणारा प्रत्येक ज्ञानी
पूजावा मनोमनी मानोनी त्यास गुरुस्थानी
