गुपित मनाचेे
गुपित मनाचेे
जगणे उधार थोडे
मरणे उधार थोडे
हवी तरी तुला का ?
पडले मनास कोडे ||१||
रडणे उगाच थोडे
हसणे उगाच थोडे
दिसली ती तुला कधी?
पडले असतील जोडे ||२||
रूसणे उगाच थोडे
जळणे उगाच थोडे
सोबत गेला होता कुठे?
स्वप्नात असेल वेडे ||३||
लाजणे उगाच थोडे
भिजणे उगाच थोडे
साधला डाव तू रे कसा?
काळीज धडधड उडे ||४||
प्रेमात उगाच थोडे
विरहात उगाच थोडे
स्वप्नात येऊन असे कोणी?
रात्रीस अवचित झोप मोडे ||५||
शब्दांचे विश्व थोडे
कल्पनांचे मनोरे थोडे
शंका नको उगाच काही!
गुपित मनाचे राहू द्या थोडे ||६||