गुलमोहर
गुलमोहर
गुलमोहरात सारे, वन रंगले गुलाबी
उजळून लाल रंगी, जणू लाजले गुलाबी
मदहोश सांधले मी, रसरंग आरशाला
मज वेचुनीच अंगी, रस पांगले गुलाबी
सम रक्तवर्ण गुच्छे, तडकावली शलाका
पडताच खालती ते, जग नांदले गुलाबी
मकरंद तो परागी, बरसेल आज जुल्मी
सजवून सेज स्वप्नी, पळ बांधले गुलाबी
गुलमोहरात ज्वाळा, जमली सुरेल यारी
तव रंग काय माझ्या, वर साधले गुलाबी

