STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Others

3  

Priti Dabade

Tragedy Others

गुलामगिरी

गुलामगिरी

1 min
249

हाडामासाचा हा माणूस

वाटावी का मालमत्ता?

मानवी हक्क सांगून

गाजवी त्यावरी सत्ता


दिला जात नाही

कधी मोबदल्याचा अधिकार

कुठल्याच गोष्टीला देता

येत नाही नकार


काम करी दिनरात्र

मुकाटपणे सारं गुलाम

आयुष्य घालवी मालकाला

सतत ठोकण्यात सलाम


तोंडातून निघत नाही

कधी चकार शब्द

अपमान होता अश्रू

ढाळून राही स्तब्ध


थांबवा ही होणारी

पिळवणूक अन् छळ

तुमच्यासाठी कोणी का

बरे सोसावी कळ?


आदर करा साऱ्यांचा

गुलाम नाही कोणी

हे सत्य निर्विवाद

जगी सर्व जाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy