STORYMIRROR

Pratik Kamble

Romance

0.9  

Pratik Kamble

Romance

गुलाबाच फुल

गुलाबाच फुल

1 min
16.6K


लाल लाल रंगाचे ते

एक गुलाबाचे फुल होते

प्रेमापोटी पाकळ्या तोडणारे

ते प्रेमवेडे एक मूॅल होते

गुलाबाच्या फुलासारखी

तुझा देखील चेहरा आहे

फुलाकडे पाहण्या ऐवजी

माझे मन तुझ्याकडेच पाहे

रुसवा फुगवा नसतो फुलात

सदा फूल खुललेल असते

कितीही सुकले झाड तरी

झाडांची साथ सोडत नसते

खऱ्या प्रेमाची ओळख म्हणून

गुलाब हा साक्षीदार असतो

प्रेमाचा प्रेमभंग झाल्यानंतर 

गुलाबाला काहीच अर्थ नसतो

नाजुक पाकळी गुलाबाची

तसे नाजुक तुझे नयन

या गुलाबाच्या फुलामुळेच 

जुळतात एक दुसऱ्याचे मन

गुलाबाच्या फुलासारखी तू

सदा खुलत रहावी

जीवनात कधी दुख नको

सदा हसत रहावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance