STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Tragedy

3  

MAHENDRA SONEWANE

Tragedy

गरीबी

गरीबी

1 min
73

(अष्टाक्षरी) 


गरीबीत जगणारा,

झोपडीत राहणारा। 

दोन वेळ भाकरीचा,

शोध घेत असणारा॥ 


वारा ऊन थंडी पाणी,

सर्व हासून झेलती। 

गरीबाला नाही कास,

काम सर्वांचे करिती॥


चातकासारखी मला,

होती पावसाची आस। 

होती गरीबी मारत,

भुकेल्या पोटाचा घास॥ 


ठेवा जमीन जुमला,

कर्जापायी सर्व गेला। 

पोटासाठी जेही केला, 

आता तुकडा राहिला॥ 


नाही हाव कोणतीही,

समाधान असणारं। 

अश्रू आलेच डोळ्यात,

अलगद पुसणारं॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy