STORYMIRROR

UMA PATIL

Tragedy

3  

UMA PATIL

Tragedy

गरीबी

गरीबी

1 min
13.8K


मेवे नि गोड मिठाई

फक्त श्रीमंतांच्या ताटी

इथे गरीब झोपतो

रोज उपाशीच पोटी

आग पडली पोटात

नाही काहीच खायला

येथे विव्हळतो जो तो

'दीन' लागे मरायला

पसरली ही गरीबी

जिथे तिथे सर्वदूर

अन्न नाही, पाणी नाही

उपाशीच लोके चूर

नशिबात लिहिलेले

भोग करावे सहन

चिकटली ही गरीबी

थोर असो की लहान

अशी गरीबी गरीबी

काय माझ्या माथी आली ?

काय करावे कळेना

अशी दुरावस्था झाली

रात्र सरता सरेना

दिन उगवतो काळा

वेळ संपता संपेना

असा गरीबी सापळा

गरीबीचे निर्मूलन

दूर करावी गरीबी

सरकार दरबारी

सांगतात ते सबबी

किती द्यावीत कारणे

दूर होईना गरीबी

शोधू लागता कारणे

दिली कारणे जुजबी

अडकलो कायमचे

गरीबीचे दुष्ट चक्र

असा हा परमेश्वर

वागे आमच्याशी वक्र

कधीतरी फळावा हो

आमचाही हा नवस

व्हाही सुटका आमची

यावे सुखाचे दिवस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy