गृहिणीची घुसमट
गृहिणीची घुसमट
गृहिणीने सगळं हसत मुखाने करायचे
पडेल ते काम बिनबोलत स्वीकारायचे
रुचकर जेवण बनवायचे
सगळ्यांना प्रेमाने वाढायचे
स्वतः नेहमी सगळ्यात शेवटी जेवायचे
एखादा दिवस का नाही जरा वेगळे वागायचे
गृहिणीला आराम करू द्यायचे
बाहेर जेवायला न्यायचे
तिचे छंद जपण्यासाठी प्रोत्साहन का नाही द्यायचे
काही घरात अजूनही गृहिणीची घुसमट होते
जग किती बदलले, तरी घर मात्र तसेच राहते
