गप्पा स्वतःशी मारताना
गप्पा स्वतःशी मारताना
स्वतःशीच गप्पा मारताना
मनात विचार आला
आपल्या आयुष्याचा
मध्यांतरही निघून गेला
पैशामागे धावता धावता
नाती हरवून बसलो होतो
कोणत्याच आनंदाच्या क्षणी
मी तिथे उपस्थित नव्हतो
काय मिळवलं याची
बेरीज बरोबर येत नव्हती
आणि काय गमावलं याची
वजाबाकी शून्य येत होती
आयुष्याच्या या धावपळीत
खूप काही गमावलं
पैशांच्या हव्यासापायी
जगायचंच राहून गेलं
