STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy Others

2  

AnjalI Butley

Tragedy Others

गोदा माय कृष्णा माय

गोदा माय कृष्णा माय

1 min
294

गोदा माय, कृष्णा माय

नका न गं एवढ्या रागाऊ

शांत करण्या तुम्हा

काय आम्ही करू?

रागावता तुम्ही

पाऊस खुप आला म्हणून

पावसाला शांत करण्यास

काय आम्ही करू?

झाडे तेहत्तीस कोटी लावण्याचे 

घेतले आहे खुप आम्ही मनावर

कळतय तुमचे दु:ख

पण लाचार आमच प्रशासन

कोटीच्या कोटी पैसे खर्च करून

बांधतो तुझ्याच कुशीत पुलं आणि घरे

शांत असता तुम्ही तेंव्हा

निमुटपणे आघात सहन करत राहता

रूद्ररूप तुम्ही धारण करता 

खडबडुन जागे होतो आम्ही

शप्पथ घेतो मग आम्ही

नमामी गंगे, बचाव मोहिम घेण्याहाती 

माय नको न असे आम्हच्यावर रागाऊ आता

शांत लवकर हो एवढीच प्रार्थना करतो आम्ही


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Tragedy