गंभीर असा मी
गंभीर असा मी
गंभीर आहे मी मनातून खूप
खूप बोलायचं मला
पण तू बोलूच देत नाही
हसरे तुझे रूप बघताना
हसणं माझं अलगद थांबत
हळूच तुझ्या बटावरी नजर माझी स्थिरते
विरहात तुझ्या खूप रडावसं वाटतं ग
तुला दुःख होईल म्हणून अश्रू माझे दाबतोय ग
माहिती तुला आहे मी तुझ्यावर प्रेम करतोय ग
म्हणुनी जगण्याची उमेद मी ठेवतो ग तुझ्यापरी

