STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational Others

4  

Sarita Kaldhone

Inspirational Others

गझल

गझल

1 min
363

येता प्रसंग बाका आधार बाप माझा

गरिबीतही कसा तो दिलदार बाप माझा


केल्या सुगंध वाटा सोसून ऊन थंडी 

तो एक पाहिला मी उबदार बाप माझा


देण्यात धर्म मानी तू राहिला उपाशी

कर्णा तुझाच होता अवतार बाप माझा


होती मधाळ भाषा ना टोचला कुणाला

कोमल फुलापरी तो अलवार बाप माझा


शब्दांत बांधता ना आला मला कधीही

शब्दांविनाच होता दरबार बाप माझा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational