STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational Others

3  

Sarita Kaldhone

Inspirational Others

गझल

गझल

1 min
363

दारात मोगरा तो गाफील होत गेला

वाऱ्यात गंध त्याचा सामील होत गेला


पाहून ठार झालो डोळे तुझे शराबी

नेत्रात जीव माझा कातील होत गेला


संस्कार दूर गेला वेडात यौवनाच्या

होतास तू भला पण फाजील होत गेला 


मानून कर्म पूजा कष्टात देव माझा

राबून रोज रानी बांधील होत गेला 


अंधार दाटताही देतो नवी उभारी

दावून वाट त्यांना कंदील होत गेला


ठेवून अंतरंगी विश्वास पेरणीचा

या वादळातही तो स्वप्नील होत गेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational