गझल :मैत्री एक सुंदर नाते
गझल :मैत्री एक सुंदर नाते
तुझी अन् माझी मैत्री एक सुंदर नाते आहे,
नात्यामधली प्रीत सुरेख गीत गात आहे.
दोन जीवांच्या अबोल भावना मांडत आहे,
आजही तुझी ती साथ हात हा मागत आहे.
तुझा चेहरा आठवताच मन हसत आहे,
तू येणार नाही कळताच मन रुसत आहे.
तुजला आजही हाक ही मनाची देत आहे,
दूर कुठे तू गेलीस नाव होठी घेत आहे.
वेळेसोबत काळ कसा हा नकळत जात आहे,
ऋणानुबंध मैत्रीचा चैताली साक्ष हीच देत आहे.
— चैताली वरघट ✍️✨
