STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Others

4  

Chaitali Warghat

Abstract Others

गझल - भाऊबीज

गझल - भाऊबीज

1 min
0

गझल

बहिणीच्या अंगणी आज भाऊबीज ही आली,
भावाच्या रूपाने घरात सुखाची सावली आली.

बालपणीच्या आठवणींनी मन भरून गेले,
घरी भावाच्या रूपात जणू माऊली आली.

लावून कुंकवाचा टिळा भावाला ओवाळले,
ऋणानुबंधाची ही सुंदर गाथा ओठावरी आली.

संकट असो कितीही, भाऊ पाठीशी तुझ्या,
बहिणीसाठी ही भक्कम ढाल धावून वेळेवरी आली.

आनंद लाभो तुजला, लाभो उदंड आयुष्य,
माझ्या मुखातून हीच आशिषाची वाणी आली.

ओवाळताना भावाला डोळे चैतालीचे पाणावले,
पैसा नको, हवी साथ सांगत भाऊबीज आली.

✍️ लेखिका / कवयित्री: चैताली वरघट
© सर्व हक्क सुरक्षित.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract