STORYMIRROR

Suhas Bokare

Romance

4  

Suhas Bokare

Romance

गीत स्वर

गीत स्वर

1 min
225

का रे कान्हा, का रे कन्हैया. 

साऱ्या संसारास, कोठे सांगू?

निर्जन जागी ह्या रात्रीची मी.

मंदिरात होते हे खोटे सांगू?


माझे गं राधे वर बघ जराशी.

नयनअमियास नयनात न्हाहु दे.

तुझा गं मखमली निसटता स्पर्श.

हा हात तुझा हातात राहू दे.


श्वास श्वासांच्या घरी तरंगले.

ओठ ओठांच्या स्वरात रंगले.

रक्तफूलं कवेत पुढे सरकले.

तेज ते प्रतिबिंबाविन पांगले.


निळ्या पाण्यात, निळ्याच अंबरात.

नि शृंगाराचा गुलाल ओलसर.

आज सोडून जाऊ नकोस कान्हा.

उधळे आज मी गीत स्वर तुजवर!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance