गीत मनाचे
गीत मनाचे
बघ गगन सप्तरंगी रूसले कधीच नाही
माझ्या मनात काही रूतले कधीच नाही
मी घट्ट बांधलेली नाती खूलून आली
हाता मधून काही सुटले कधीच नाही
मी साद घातली अन् आले जमून सारे
या जीवनी नकोशी ठरले कधीच नाही
आणि मनात सारे तारे स्वयं प्रकाशी
आत्मी मलीन माझ्या गमले कधीच नाही
तेवीत ठेवली मी ही दीपिका मनीची
अंधारल्या मनाशी रमले कधीच नाही
मी गात राहिले अन् गाणे सूरेल झाले
बेताल वागणे मज जमले कधीच नाही
