धुळवड सृष्टीची
धुळवड सृष्टीची
1 min
125
आज सृष्टी खेळण्यात दंग आहे
घेतला बघ का तिने नव रंग आहे
पांघरूनी बैसलेली शाल कैसी
कंच हिरवे वस्त्र झाले तंग आहे
नाचताना मस्त आहे बावरी ती
पंचभूतांचा तिला जो संग आहे
पालटूनी टाकण्याचा रंग सारा
बांधला बघ आज काही चंग आहे
चौकटीला मोडुनी मग वागण्याचा
नियम केला आज थोडा भंग आहे
