शोध माझा
शोध माझा
कालचा सोबती आज मी शोधते
गोठल्या भावना मी पुन्हा शोधते
टोचरे बोचरे शब्द ही पारखे
सोसल्या यातना मी पुन्हा शोधते
थांबले भेटणे खुंटले बोलणे
संपल्या वेदना मी पुन्हा शोधते
गुंतले भाव जे सोडले मोकळे
तोडल्या शृंखला मी पुन्हा शोधते
स्वप्न बघ कालचे मखमली साजिरे
त्यातल्या जाणिवा मी पुन्हा शोधते
कालचा सोबती आज मी शोधते
गोठल्या भावना मी पुन्हा शोधते
टोचरे बोचरे शब्द ही पारखे
सोसल्या यातना मी पुन्हा शोधते
थांबले भेटणे खुंटले बोलणे
संपल्या वेदना मी पुन्हा शोधते
गुंतले भाव जे सोडले मोकळे
तोडल्या शृंखला मी पुन्हा शोधते
स्वप्न बघ कालचे मखमली साजिरे
त्यातल्या जाणिवा मी पुन्हा शोधते
