STORYMIRROR

Sandhya Kadam

Others

3  

Sandhya Kadam

Others

रामरुप

रामरुप

1 min
77

राम मनी ठसावा

राम जनी दिसावा

आचरणी राम असावा

जीवनी राम यावा.

रामरंगी रंगून जावे भाव राममय

व्हावे रामास सदा

स्मरावे विश्वरूप जाणावे

नाही बंधन नाही सीमा

नाही पायरी नाही उंबरा

मी राम तू ही राम खरा हा

रामरुपी सारा पसारा

इथे राम तिथे राम

राम राम विभू राम

जाणीव राम नेणीव राम

राममय मी,

गात्र राम

मज कशास हवे बंधन

मनी वाजे सदा राम धून

राम चरणी नत तल्लीनअंती

रामात होईन विलिन 


साहित्याला गुण द्या
लॉग इन