घर
घर
घर देता का हो मला घर
फिरते वणवण शहरभर//धृ//
शिक्षकांना असे मान सन्मान
समाजाचा शिल्पकार म्हणे जन
घडविण्या विद्यार्थी अर्पिले तन-मन
सर्वधर्मसमभाव हाच मनी असे भाव //१//
घर देता का हो मला घर
सर्व ही आपलीच लेकरे मानले
प्रेम केले उदंड मायेच्या ममतेने
कर्म भूमी जन्मभूमी हा माझा महाराष्ट्र
घर मिळण्यासाठी करिते अपार कष्ट //२//
घर देता का हो मला घर
महाराष्ट्राच्या लेकीला घर मिळेल का
शिक्षकांना न्याय मिळेल का
सर्वधर्म समभाव रूजेल का
माणुसकी खरी कळेल का
मला घर मिळेल का हो घर //३//