घे सांभाळून
घे सांभाळून
तुझी माझी जोडी जमली
सारे थकून जातील मिरच्या ओवाळून....
तुला मला कोणी ठेवेना नाव
माझ्या घरच्याना तुझा रुबाब दाव
सारे जण तुला घेतील संभाळून...
तू किती छान दिसशील माझ्यासोबत
मी माझे लिहले संजोग तुझ्यासोबत
हातात हात दे प्रेमात घे आवळून...
माझ्या घरची तू हो प्रमुख सदस्य
ओठावर येईल माझ्या तुझ हास्य
हो तू माझी साऱ्या गावाला जळवून...
सगळ्यात भारी सून आमची सारे बोलतील
छाती फूगेल संगमची सारे तुझे लाड करतील
जन्मभर ठेवीन तुला मी संभाळून...

