Varsha Shidore

Inspirational


3  

Varsha Shidore

Inspirational


घास विचारांचा...

घास विचारांचा...

1 min 12K 1 min 12K

भुकेल्यास माणुसकीचा 

द्यावा घासातील घास 

आपुलकीचा सर्वांसाठी 

असावा हृदयी निवास... 


आधार निराधारांचा 

घास समाजभानाचा 

सत्कर्माचा घेऊन वसा 

द्यावा संदेश एकतेचा... 


घास एक आत्मीयतेचा  

पशु-पक्ष्यांशी मित्रता 

वाढविण्यास सन्मान 

जाणून मूल्य बंधुता... 


बदलाची धरून कास 

ध्यास सकारात्मकतेचा 

एकमेकांप्रती कर्तव्याचा 

द्यावा घास विचारांचा... 


Rate this content
Log in

More marathi poem from Varsha Shidore

Similar marathi poem from Inspirational