Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rekha Sonare

Inspirational

3  

Rekha Sonare

Inspirational

गगन भरारी

गगन भरारी

2 mins
236


सारा आसमंत कवेत माझ्या

मुक्तपणे वावरते नवयुगात

सोडून मूद अहंपणाची

स्वातंत्र्य नांदते रगरगात//१//


जिच्या हातात पाळण्याची दोरी

तीच सर्व जगाला उद्धारी

कर्तृत्व तिचे ते जाणुनी

आजची नारी पुरुषाला भारी //२//


खांद्याला खांदा लावूनी

चालते ती पुरुषांच्या

रांधा वाढा उष्टी काढा

का म्हणून अपेक्षा यांच्या //३//


रिक्षा ते अंतरिक्ष भरारी घेता

नारीला मान सन्मान दिला

समशेर तळपली रणांगणी

म्हणतात रणरागिणी तिला//४//


अज्ञानातुन ज्ञानाचा दीप 

उजळून तेजोमय प्रकाश पडे

होता डॉक्टर, वकील, इंजिनिअर

यशाची विश्वविक्रमी नोंद घडे//५//


झोळीत पिल्लुला बांधुनी

शिवारी राबता कष्ट तुझे न्यारे

डोई दगड विटांचे ओझे वाहुनी

घर दार संधान साधते सारे//६//


पहिले पाऊल पडता संसारी

सर्वांचे सुख दुःख ती मानते

खेळात प्राविण्य पटकावून

ती स्त्रीत्वाची मान उंचावते//७//


मान तुला सदैव मिळावा

नेहमी रहावी तू हिरकणी

सातसमुद्रापार झेंडा गाडुनी

अजिंक्य तुझी अचाट करणी//८//


आघाडी  तिची सर्व क्षेत्रात

म्हणता तिला आजची नारी

सामाजिक, आर्थिक भार पेलूनी

सुखदुःखात पुरुषालाही तारी//९//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational