गेले ते दिवस
गेले ते दिवस
मध्येच कधीतरी बसुनी एकांतात
आठवले मला ते जुने दिवस
वाट ही आडवळणाची अनोळखी ती वाटू लागे
अंधारमय वाटेतही रातकिड्यांची सर असे
नाचूनी बागडूनी त्या पारंब्याला आता ती शोभा नसे
शुष्क पानाची लय नसे उरले ते अवशेष आता
आता ते दिवस सारूनी येत नाही पुन्हा
आता तसे बागडणे दिसत नाही पुन्हा पुन्हा
