गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी


गेले ते दिवस बिनधास्त कुठेही फिरण्याचे
कंटाळा आला की भटकण्याचे
राहिल्या फक्त आठवणी
परत आणेल का कुणी
गेले ते दिवस लग्नाला हजार लोक भेटण्याचे
दूरच्याही लग्नाला जाण्याचे
राहिल्या फक्त आठवणी
काही करू शकत नाही कुणी
गेले ते दिवस घरी पार्टी करण्याचे
मंदिरात भली मोठी रांग लावून दर्शन घेण्याचे
राहिल्या फक्त आठवणी
देव ऐकेल का कुणी
गेले ते दिवस बिना मास्क फिरण्याचे
मन मानेल ते करण्याचे
राहिल्या फक्त आठवणी
जाणिले दैव कुणी