STORYMIRROR

Mrudula Raje

Fantasy

4  

Mrudula Raje

Fantasy

गाव जपे परंपरा

गाव जपे परंपरा

1 min
151

येता गावाची गं सय, आठवे गावाचे मंदीर।

मंदिराच्या गाभा-यात , विठ्ठलाची मूर्ती सुंदर॥


गावाच्या गं वेशीवर, ओढा वाहे झुळझुळ।

गावी प्रवेश करता, पाण्याचा स्पर्श निर्मळ॥


ओढ्यामध्ये प्रतिबिंब, मंदिराच्या कळसाचे।

नमस्कार मनोभावे, प्रतिक हे संस्कृतीचे॥


वर्षाकाठी भरे जत्रा, उत्सव विठू माऊलीचा।

लेकींसाठी साडीचोळी, मान पहिला जावयाचा॥


गावाची ही परंपरा, मना पाडते भुरळ।

माहेरवाशीण गावाची, गावी जावया व्याकुळ॥


गाव सजले सुंदर, रांगोळ्यांची गं बहार।

गुढ्या-तोरणे सजली, शोभे मंदिराचे द्वार॥


मंदिरात विराजतो, माझ्या गावाचा गं राजा।

मायबाप हा गावाचा, ह्याचा त्रैलोक्यी गाजावाजा॥


गाव माझे जपतसे, परंपरा अन् संस्कृती।

विठ्ठलाच्या पायी माझ्या, गावाची गं जडे भक्ती॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy