STORYMIRROR

Manisha Wandhare

Fantasy

2  

Manisha Wandhare

Fantasy

गाणे ओले केले...

गाणे ओले केले...

1 min
47

सरींना शुष्क करून तिने शब्द ओले केले ,


तुच सांग परी कसे माझे गाणे ओले केले ...

मुकी होती वाचा तिची डोळ्यांतून बोलले ,


तिच्या शुभ्र कांतीने चौफेर धुके ओले केले...

झिरीमीरी सांजेची लाली गाली तिच्या आली,

सूर्यही ढगाआळ होता धरणीला ओले केले ...

अंधारून गेली जेव्हा रात्र तेव्हा रात्र संगतीला,

दुःख डोळ्यातून वाहून उश्याला ओले केले ...

ओलांडले माप उबंर्‍याचे सोबती ठसे कुंकवाचे,

सौभाग्याचे लेणे लेवून माहेर ओले केले ...

कंपीत स्वर सुस्वरला सवे तालही दिला त्याने,

सुस्वरात गाऊनही कोकिळेने डोळे ओले केले...

सरींना शुष्क करून तिने शब्द ओले केले ,

तूच सांग परी कसे माझे गाणे ओले केले ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy