STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

गाढव...!

गाढव...!

1 min
903

गाढव....!

गाढव हा शब्द कानावर आला

की आपोआप भानावर

आल्या सारख वाटत....

गाढवा ,लेका ,गाढवाच्या

गाढवा सारख, गाढवचं

असे एकेरी शब्दांनी कांन भरायचे...

गुरुजींच्या सखोल

ज्ञानाची आणि शब्द सामर्थ्याची

तीच खरी ओळख असायची...

हातावरची छडी

पाठी वरचा धपाटा बुक्का

आणि बुडावरची लाथ ही भूषण असायची..

तेंव्हा जे कळत नव्हतं

ते आता कळतंय

त्यांची लाथ गाढवाचीच देन होती...

गाढवाचा माणूस बनवणंआणि ते ही

गाढवासारखच अतोनात कष्ट करून

हे फक्त त्याकाळचे गुरुच जाणत...

आज माणूस म्हणून

जीवन जगताना गाढवाच स्मरण होतं

आणि डोळ्याचं तळ डबडबतं...

गाढव खरचं आमचं दैवत होतं

त्यानं लाथा खायलाही शिकवलं

आणि लाथा द्यायलाही शिकवलं....

कष्टाची खरी ओळख मला

गाढवनेच करून दिली

आणि त्या गाढवाचा माणूस बनवलं...

आजही गाढव दिसलं की

पुनर्जन्म आठवल्या सारख होतं

गाढवाच मोल मला आता कळतं....

आपलं जीण ही गाढवसारखच असत

जे दिसत ते नसतं हे सारं जग जाणतं

पण गाढवाच जीणच आता छान वाटतं..!

जागतिक गाढव दिनाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा...!

©प्रशांत शिंदे,हसूरचंपू

8007740679


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational