#एकटेपण
#एकटेपण
आयुष्याचे पुस्तक उघडून
बोलू लागले एक पान
उंची गाठण्या जाशील तू जर
जावे लागेल अपयशाला सामोरं
तुलना तू तुझ्याशीच कर
तुझ्यातल्या आधी चुका सुधार
जेव्हा होईल त्याचे आकलन .....
नकोस तोरा मिरवू मोठा
होईल गर्वाने तुझाच तोटा
नको त्या धनसंपत्तीचा साठा
श्रीमंती मनाची देईल मोठेपण ....
चलबिचल मनाची करील घायाळ
टोचून बोलण्याने उठतील वळ
दुखरी नस जरी सोस जराशी कळ
माझ्याशी दोस्ती घालवीन एकटेपण ...
प्रा. सौ. नलिनी लावरे
