STORYMIRROR

Latika Choudhary

Tragedy

2  

Latika Choudhary

Tragedy

एक्स्चेंज

एक्स्चेंज

1 min
2.2K


माणसे भेटत राहतात

मने ही जुळत राहतात

विचार आचार होतील एक

असे वाटत असता

मार्ग दुभंगत जातात.

तो दिसतो तसा नसतो  

नसतो तोच खरा भासतो.!

आभासी दुनियेचा हा

खेळ खेळता  खरे काय अन

खोटे काय शोधण्यात आयुष्य फसते!

माणसातले जनावरपण वर डोके काढत

जनावरातले माणूसपण दुर्लक्षित होत

माणूस नावाजत जातो

अन होत राहते बदनाम जनावर

जनावरे होत चाललीत शाकाहारी

माणूस तोडतोय लचके आई. बाई....पोरींचे.. ..!

जात, पात वय, धर्म

वर्ज्य त्याला काहीच नाही.

फक्त आणि फक्त' मादी ' हवीय

घाबरतेय त्याची आई,बहीण,पोटची पोर

त्याच्या समोर यायला

बायकोही, कारण करू शकतो तो

एक्स्चेंज.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy