STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Abstract

3  

शिल्पा म. वाघमारे

Abstract

एकाकी

एकाकी

1 min
262

आज पिकले पान मी

काल काही और होते

सुरांच्या मैफिलीतला

मी ही धुंद सूर होते


आज बाग ही मनाची

फुले ती आठवणींची

काल होती किलबिल

चिवचिव पाखरांची


आज भयाण हे जग

माझ्या सुन्न करी जीवा

होती रंगीत दुनिया

रंग कोणता हा नवा


आज पिल्ले माझी सारी

मला झालीत पारखी

ओळख ना देई कोणी

झाली परक्या सारखी


माझा लळा, प्रेम, माया

काल होते त्यांना हवे

पंखांमध्ये येता बळ

आकाश शोधले नवे


होती जगण्याची आशा

आस आणि स्वप्ने नवी

निराशेचे हे मळभ

नित्य मृत्यूला आळवी


रूक्ष पिकले हे पान

पानगळ बाकी आहे

गोतावळ्यात माझ्याच

आज मी एकाकी आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract