एक मित्र - अरमान
एक मित्र - अरमान


आहे तो माझा एकुलता मित्र,
तो असेल तर भुंकणार नाही कुत्रं,
तोच आहे एक अविभाज्य पात्र,
त्यामुळे तर होते जीवन पवित्र
सारखे माझ्यासाठी धाऊन येतो,
विचार न करता मला मदत करतो,
कायम तो मैत्रीसाठी तर मरतो,
त्यामुळेच तर आम्ही सर्व जिंकतो
खूप पुढील आहेत त्याचे हे विचार,
त्याच्यामुळेच पुढे राहतो मी फार,
काय आहेत त्याचे ते आचार,
जसे ते आहेत धावत्या विजेची तार
आहे तो या कवीचा प्रधान,
तोच आहे या मित्रांची शान,
त्याच्याबद्दल खुपच आहे मान,
कारण, नाव आहे त्याचे अरमान