दुष्काळ
दुष्काळ
पिके शेतातलि बघा
चालली कशी करपून
प्यायलाच वणवण पाण्याची
शेतीला मिळेल कुठुन?
विहीरींनी गाठले तळ
जित्राप हंबरती पाण्यासाठी
जागोजागी चाराछावण्या दिसू लागल्यात
जित्रापांना जगवण्यासाठी
जगाचा पोशिंदा हतबल होऊन
काळ्या आईला साश्रू नयनांनी पहात आहे
नाही शक्य दुष्काळापुढे काही
हेच आईला तो आर्ततेनं सांगतो आहे
पाण्यासाठी मैलो न् मैल जो तो
रणरणत्या उन्हात हिंडत आहे
थेंबभर पाण्याविना हातातोंडाशी आलेला घास
स्वतःच्या हातांनी नष्ट करावा लागत आहे
करा एकच पण सगळ्यांनी
पाणी बचत हीच काळाची गरज
नाही करणार अपव्यय पाण्याचा
दुष्काळाने दिलीय आम्हांला पाणी वाचवण्याची समज
