दुरावा
दुरावा
दुरावा कधी भासत च नाही
दूर असून ही तू दूर असत च नाही
असाच रेंगाळतोस
अजुबाजु स माझ्या
मग दूर आहेस असं कस रे म्हणू राजा
शरीराने तू नस्तोस कधी हजर पण एक क्षण ही तुझ्यावरुन हटत नाही माझी नजर
दुरावा हा सख्या
मज प्रिय किती
आत्म्यास स्पर्शून जाते
तुझी प्रीती
होईल भेट एकदा आणि मिटेल हा दुरावा
ह्या दुराव्यातील प्रत्येक क्षण
आता माझी ऊर्जा ठरावा

