STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

दुनिया बेईमान असते...

दुनिया बेईमान असते...

1 min
253

दुनिया एवढी बेईमान असते

मला जर का माहित असते,

या दुनियेशी माझे मुळीच

काही देणेघेणे नसते..


माझ्या चांगुलपणाचाच

साऱ्यांनीच फायदा घेतला,

संधी साधून त्यांनीच मोठा

माझ्या वरच डाव घातला.


दु:खच येतं आपल्या वाट्याला

करुन उपकार कुणावर,

डाग शेवटी आपल्याला

आपल्याच चांगुलपणावर.


कसं ओळखावं दुनियेला

ठेवावं भरोसा कुणावर,

केवढी दुष्ट ही दुनिया

करुन उपकार दुनयेवर.


शेवटी करणार काय

पश्चात्ताप नी दुःख,

आपणच पहायचं

याही दुनियेचं सुख.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract