दुःखाच ठिगळं
दुःखाच ठिगळं
गरीबाचा नाही वाली
कुणी पांघरूणही घालेना
आभाळाच छप्पर डोईवर
जीव सुखात जाईना
नेटका संसार करण्या
पैसा घरात येईना
पोटाची खळगी भरण्या
कधी पोटात तुकडा जाईना
सावकाराच कर्ज
फिटता फिटेना
जगाच्या पोशिंद्याचा
संसार नेटका होईना
दुष्काळात तेरावा महीना
अवकाळी पाऊस अन गारा
दुःखाला ठिगळ लावून
पोरगी शिवे बापाचा सदरा
नाही हरला अजूनी
जरी कहर नियतीचा
अभिमान असे आम्हा
या जगाच्या पोशिंद्याचा
