दुःख
दुःख
दुःखाला थोडे विलगीकरणात ठेवावे म्हणतो
दुःखाला थोडे अंतर द्यावे म्हणतो
दुःखावर थोडा मुखवटा चढवावा म्हणतो
दुःखाचे संपूर्ण
लसीकरण करावे म्हणतो
दुःखाने इतके बाधित केले आहे की
सुखाच्या ऑक्सिजन शिवाय पर्याय नाही
सुखाचा तुटवडा झाला की
दुःख अखेरचा श्वास घेतं.
