STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

दु:ख

दु:ख

1 min
246

कोसळता दु:खाचा डोंगर

गेले जवळचे सारे दूर,

डोळ्यात अश्रूंचा महापूर

नाही कोणीच पुसणार.


दु:ख अनावर झाले

अश्रू नयनी हे आले;

मतलबी किती साले

कसे दूर निघून गेले.


दोष कुणाला का देवू

दुनिया ओळखून घेऊ,

सुख दुःख सारे पाहू

तोंड संकटांना देवू.


धावा कुणाचा करु नये

मुळी भरोसा धरु नये,

मागे कधीच सरु नये

त्याग जीवाचा करू नये.


दुःखात संयम ठेवा

धडा जगण्याचा घ्यावा,

भलाबुरा ओळखावा

सूर्य उगवतो नवा.


दुःख येतं जातं

परीक्षाच ते घेतं,

प्रत्येकाच्या जीवनात

सुख, दुःख हे असतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract