STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

दमडी

दमडी

1 min
265

मतलबी खोटी नाती,

स्वकीय परके होती.

दोष कुणास तो द्यावा,

डोळे भरुन वाहती.


साथ कुणी नाही द्यावी,

मनी ठिकऱ्या जिव्हाळी.

भावनांची दिसे होळी,

प्राक्तनांचा खेळ भाळी.


माणुसकी भासवत,

दमडी रक्त प्राशत.

रक्ताची नाती कोसत,

बंध रेशीम नासत.


प्रेम,हास्य झोपडीत,

नसे बंगला गाडीत.

धुंद अहंम नशेत,

देव नसे गाभाऱ्यात.


मोहजाळी अटकला,

दमडी मागे पळला.

देहभान हरपला,

यंत्र मानव बनला.


सजे दवबिंदू माळा,

फुले आनंदाचा मळा.

क्षणभंगूर सोहळा,

जन्म त्यालाच फळला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational