STORYMIRROR

सानिका कदम

Romance

4  

सानिका कदम

Romance

दिवस ते प्रेमाचे...

दिवस ते प्रेमाचे...

1 min
333

दिवस होते ते साजरे

तुझ्या माझ्या प्रेमाचे

उमलत्या फुलांसारखे

चांदण्यात रंगून जाणारे...


तुझ्या स्वरात नकळत तेव्हा

शब्द माझे मी गुंफले

शब्दांतल्या त्या कळयांना

तु ताला-सुरात गायीलेस


रातराणीच्या गंधात तेव्हा

प्रेम अपुले बहरले

सावली होऊन मी तुझी

तुझ्यासवे एकरुप जाहले


तू माळलेल्या मोगऱ्याने तेव्हा

मन माझे मोहरुन गेले

कसे सांगू मी तुला.....

तुझ्या माझ्या प्रेमाचे गुपित

मी आजवर मनोमनी जपले......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance