STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

4  

काव्य चकोर

Abstract

दिवाळी एक उहापोह

दिवाळी एक उहापोह

1 min
307

ते म्हणाले, कशी गेली दिवाळी..?

मी म्हटले, अजून यायची आहे

ते म्हणाले, मग गेली ती काय..?

मी म्हटले, ते दिवाळे होते

आनंदाचे भ्रमित जाळे होते..

होते नव्हते ते धुऊन नेले

आता

झुलणाऱ्या कंदीलाची लक्तरे निघतील

विझलेले दिवे कोनाड्यात निजतील

रंगोळ्यांचे रंग फिके पडतील

पुन्हा भिंतीवर जळमटे चिकटतील

माणसे केवळ उहापोह करतील

आणि सवयीने विसरून जातील

पुढची दिवाळी येईपर्यंत..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract