दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियादारी
मैत्रीचे ब्रीद वाक्य
*दिल दोस्ती दुनियादारी!!*
कानी शब्द पडताच
मैत्री वाटते फारच भारी!!
कधी असते ती खट्याळ
तर कधी ही रडवते!!
मैत्रीत ही दुनियादारी
खूप मला सतवते!!
मैत्रीचा धागा जीवनात
शिकवून जातो सर्व!!
कधी कोमल मृदू
तर कधी चढतो गर्व!!
धूंद ते दिवस असतात
खऱ्या त्या मैत्रीची!!
ऋृदयातून स्पंदने निघे
मैत्री असे खात्रिची!!
शिकवून जाते सर्वकाही
ही मैत्री दुनियाची!!
खरे काय नि खोटे काय
तमा मला कशाची!!
*दिल दोस्ती दुनियादारी*
*मैत्रीची अशी गंमत न्यारी*
