ध्येय
ध्येय
चित्र पाहुनी वाटते
स्वारी चालली मोठया ऐटीत
आब दिसते मनमोहक
यांच्या बैठकीत...
खांद्यावरती बंदूक घेऊन
शिकार करण्या झाले मार्गस्त
विचारात जणू गुंग होऊनी
आहेत आपल्या मस्तीत व्यस्त...
कोण चित्रकार देव जाणे
पण चित्र चितारले मस्त
छाया प्रकाशाचा सुंदर
केला आविष्कार रास्त...
