STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Romance Others

3  

कुमार भयकथासूर

Romance Others

धुंद पावसाची सर

धुंद पावसाची सर

1 min
229

आली धुंद पावसाची सर , मनातला भरला मोहर

चिंब भिजलेली उभी होती तु माझ्या समोर

एका हातात पुस्तक दुसरा हात डोइवर

तरी होता तो भिजवीत त्याला नव्हती तुझी कदर


ओघळून आले पाणी तुझ्या गुलाबी गालावर

हलक्या हाताने डोळ्यावरची बट मागे कर

काळेभोर डोळे तुझे घेती माझ्या मनाचा ठाव

मोहक तुझ्या अदांनी घातला हृदयावर घाव


गुलाबी ओठांची घडी तू उघडून दिली साद

तुझ्या मंजूळ आवाजाने माझा भेजा झाला बाद

मनात आले ह्या पावसाने असेच पडत रहावे

तुझ्या सौंदर्यात मी स्वतःला हरवून जावे


होता आपली नजरा नजर मी पाहिले दुसरीकडे

तरी ओळखले होते तू, माझे लक्ष होते फक्त तुझ्याकडे

पाहून मला केले हलकेच स्मित

माझ्या मनात प्रेमाचे झंनकारू लागले गीत


येऊन जवळ केला इशारा हातातील छत्री कडे

तुला समोर पाहताच मन नाचू लागले वेडे वाकडे

घेऊन माझी छत्री तू निघाली जेव्हा

जाताना तुला पाहून कसेनुसे झाले मनात तेव्हा


वाटले आवाज देऊन घ्यावा उद्या भेटायचा वादा

तेवढ्यत वळून ती म्हणाली धन्यवाद दादा

पहिल्या नजरेच्या प्रेमाचा झाला चांगला चकनाचूर

पावसाच्या त्या धारेत रडून घेतले भरपूर


छत्री गेली घेऊन बनवून मला भाऊ

आता काय घरी जाऊन आईच्या शिव्या खाऊ

आवडली असेल माझी कविता तर द्या नक्की दाद

नाही दिली तर तुमचा सोबत पण होईल अशी दुंध बरसात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance