धुंद झाले मन
धुंद झाले मन
गार गार वारा
येई अंगावर शहारा
डुलती पाने फुले
झुळूक सहारा. .1
थंड गवताची पाती
दव पायांना झोंबती
पोषक पहाटेचि हवा
ओठ थडथडून जाती. .2
संथ येत सरी
नाद कानी पडे
पक्षी घरट्यात
निसर्ग नवल ते घडे. .3
घेत रजा प्रखर प्रकाश
झाकळले हे आकाश
आल्हाददायक दिवस
कामास अवकाश . .4
किमया गुलाबी थंडीची
धुंद झाले हे मन
होता मिलन जिवलगाशी
दिसतं प्रसन्न. . 5

