धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
शूर पराक्रमी शिवाजीचा तो छावा,
धर्मवीर छत्रपती संभाजी हो राजे,
स्वराज्य रक्षणा तेजोमय कारकीर्द,
सर्वक्षेत्री निर्विवाद जग वर्चस्वी गाजे.
डावपेच, गनिमी कावा ही आत्मसात,
आग्राहून परतीचे बुद्धी चातुर्य ही थोर.
चौदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला,
संगीत,पुराणे,धनुर्विद्या काव्यलंकार.
जातीभेद,अंधश्रद्धेचा तिमिर जाळत,
केला अल्पकाळी स्वराज्य विस्तार.
मोघलांची तोबातोबा म्हणण्याची वेळ,
शत्रूला झुंजवत रणांगणात झंकार.
स्वकीयांच्या फितुर जाळी अडकला,
स्वराज्य रक्षणा देह बलिदान पावला.
स्वराज्य व धर्मपरिवर्तन मागे नराधम,
औरंगजेबाने हालहाल करत मारला.
सळसळले रक्त साऱ्यांचे पाहता दृश्य,
नसानसातून शूर संभाजी अवतरला.
पवित्र रक्ताचा मळवट भरून उभा,
जुलमी राजवट उध्वस्त तेव्हा जाहला.
