STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract Others

4  

काव्य चकोर

Abstract Others

धोरण

धोरण

1 min
260

धरणीच्या उदरातून

हे असं कोणतं रोपटं उगवलंय

की लोक हिरीरीने त्यास खतपाणी घालत आहेत

अंजारत आहेत आणि गोंजारत आहेत..!!

बहुतेक त्या रोपट्याची

अजून जात निश्चित झाली नाही

म्हणूनच लोक त्यावरून भांडत आहेत..

कमी अधिक प्रमाणात पाणी सांडत आहेत

आणि पुन्हा पुन्हा माती उकरून काढत आहेत..!!

प्रत्येकजण खेचू पाहत आहे त्याला

आपल्या जातीत

पण त्यांना माहीत नसावे बहुतेक

उद्या हेच रोपटे

झाड बनून कसली फळं देणार आहे?

रसाळ गोमटी?

की विषारी निपजणार आहेत?

की मातीत जन्मलेल्या ह्या रोपट्यास

खतपाण्याचा अतिरेक

पुन्हा मातीत मिसळणार आहे..?

कळत नाही हो,

ह्या रोपट्याचा बाबतीत

माणसाचं धोरण, नेमकं काय आहे..??

ते त्याचं संवर्धन करताहेत?

की आपल्याच ऱ्हासास कारणीभूत ठरत आहेत..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract