धमक आहे माझ्यात
धमक आहे माझ्यात
जग जिंकण्याची अफाट
धमक आहे माझ्यात
जीवनाला कलाटणी देण्याची
चमक आहे माझ्यात || 0 ||
असंच विस्कळीत ओंगळ
जीवन का जगावं
अपयशी लोकांच्या नजरेने
जग का बघावं
जीवन सुशोभित करणारं
यमक आहे माझ्यात
जीवनाला कलाटणी देण्याची
चमक आहे माझ्यात || 1 ||
बेचव जीवनावर इथे का
खूष आहेत सारे
कोणत्या दिशेने वाहत आहेत
या नक्षत्रांचे वारे
नशीब चविष्ट करणारं
नमक आहे माझ्यात
जीवनाला कलाटणी देण्याची
चमक आहे माझ्यात || 2 ||
